नाशिक मिरर वृत्तसेवा :
मधील श्रमिकनगर येथील हंसनगरी परिसरात १ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने दोन मोटरसायकल जाळल्याने परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान,घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे.यामध्ये स्थानिक रहिवासी असलेले बाळासाहेब पवार आणि त्यांचा मुलगा सागर पवार यांची एमएच १५ एफएफ ८८८२ आणि एमएच १५एटी ४७८८ या दुचाकीचा समावेश आहे. या घटनेची माहिती कळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.
तरी श्रमिकनगर परिसरात ऐन दिवाळीच्या सणासुदीत अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.ज्या ठिकाणी गाड्यांची जाळपोळ झाली त्याच ठिकाणाहून काही. दिवसापूर्वी आरोपींच धिंड काढली होती.सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासुन गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून सातपूर पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
