नाशिक मिरर वृत्तसेवा :

सातपूर औद्योगिक वसाहतीतील ज्योति स्ट्रक्चर्स लिमिटेड या कंपनीच्या सेकंड प्लांट ई. ६० व ६१ मध्ये दि. २० डिसेंबर रोजी दु. अडीच वाजेच्या सुमारास कंपनीतील साफसफाई करीत असताना येथील पियुसी टॅंकला अचानक आग लागल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये कंपनीचे किती रुपयाचे निश्चित नुकसान झाले हे समजू शकले नाही.

दरम्यान ही आग विझवण्यासाठी एबीबी कंपनीतुनीच्या अग्निशमन यंत्रणेनं आग विझवण्यासाठी पहिले प्रयत्न केले. याचवेळी मनपा सातपूर अग्निशमन विभागाच्या वाहनांनीही आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.तब्बल तासभर या पियुसी टॅंक मधील आग धुमसत होती. कंपनीतील मागील बाजूस साईडला असलेल्या पियुसी टॅंकला आग लागल्याने, तब्बल तासभर आगीचे लोळ तसेच धुराचे प्रचंड मोठे लोट आकाशात दिसत होते. तर आजूबाजूच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनीही आग बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

 

हि आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकले नाही, गेल्या अर्धा वर्षापासून प्लॅन टू हा कारखाना बंद होता. मात्र नुकतेच पुन्हा नव्याने कारखाना, चालू करण्यासाठी साफसफाई तसेच इतर कामकाज चालू असताना अचानक, आज दुपारी घटना घडल्याचे कंपनीचे व्यवस्थापक प्रसन्न काळकर यांनी सांगितले.मनपा अग्निशमन विभागाच्या पथकाने ४ ते ५बंबाने तासाभराच्या यशस्वी प्रयत्नानंतर अखेर या आगीवर नियंत्रण मिळवले, सातपुर पोलिसांचे पथकही घटनास्थळी उपस्थित होते.

 

बातम्या

Don`t copy text!