जिल्हाधिकारी कार्यालयात दि.2 जानेवारी 2025 रोजी शिक्षण मंत्री दादा भुसे व विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासमोर 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने ,सिन्नरच्या जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकलीचा आवाज गरजला! सिन्नर मधील बारागाव पिंपरी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थिनी प्रांजल जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भाषण केले. ही भाषण ऐकून मंत्री महोदय मंत्रमुग्ध झाले. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल मॅडम यांनी सदर विद्यार्थी नेते मनापासून कौतुक केले व विशेष गोष्ट म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी मित्तल मॅडम यांनी मुलीच्या सोबत असलेला पालकांना आपल्या जवळ आवर्जून बोलावून घेतले व बारागाव पिंपरी शाळेचे त्यांच्यासोबत असलेले शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर व सोबत असलेले तंत्रस्नेही शिक्षक सोनवणे सर यांचेही अभिनंदन केले. एकंदरीतच काय तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांचा आकर्षणाचा केंद्र ठरली ती बारगाव पिंपरी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थिनी कु. प्रांजल !
