नाशिक मिरर वृत्तसेवा :इंदिरानगर

दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेला प्रभाग ३१ येथे ज्ञानेश्वर नगर येथील दत्त मंदिर येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य निधीतून तसेच नगरसेवक सुदाम डेमसे ह्यांच्या प्रयत्नातून वासननगर, ज्ञानेश्वर नगर आणि शरयूनगर भागातील येथील २ कोटी रुपये मंजुरीतून रस्ते डांबरीकरनाच्या कामासाठीचा शुभारंभ नाशिक जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख तसेच शिवसेना उपनेते अजय बोरस्ते ह्यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. प्रसंगी अजय बोरस्ते ह्यांनी सुदाम डेमसे ह्यांच्या कामाचे कौतुक केले. आणि अजून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासित केले. तसेच राजमाता जिजाऊ ह्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पन करत त्यांना विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाला ह्याप्रसंगी प्रभागातील अनेक जेष्ठ नागरिक, महिला आणि युवक उपस्थित होते. कार्यक्रमास  अमोल जाधव, पुष्पा आव्हाड, भगवान दोंदे, शिवसेना विभागप्रमुख चेतन चुंभळे, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी करुणा धामणे, पुजा तेलंग, छाजेड ताई, जेष्ठ नागरिक चव्हाण काका, सूर्यकांत आरोटे, देशमुख काका, चिंचोले काका, दांडगे सर, बोराडे काका, सुरेश ठाकरे, समीर जोशी गुरुजी, लिंबा दुसाने, राजेंद्र गरुड, बिपीन सुतार, रामदास चुंभळे, वामन जाचक उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!