नाशिक मिरर वृत्तसेवा : श्रमिक नगर परिसरात राहणार मछिद्र शिंदे (नाव बदलले )राहणार हिंदी शाळेजवळ या तरुणाला लग्नाच्या नावाखाली चांगलाच गंडा घालण्याचा प्रकार समोर आलेला आहे.
या प्रकरणी त्याने सातपूर पोलिसांनी तक्रार केली आहे. संबंधित तरुण याने अशोक नगर परिसरातील राधाकृष्ण मंदिरात आपल्या ठराविक नातेवाईक व मध्यस्थ त्यांच्या मदतीनेशुक्रवार(दि 3) ३२ वर्षीय महिलेशी पारंपारिक पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर पत्नीने आजारी असल्याचे बतावणी करत चार दिवस वेळ मारून नेली, मंगळवार (दि 7)मात्र माहेरी सवासनीच्या कार्यक्रम आहे. असे सांगून पाथर्डी गावात जाते असे सांगून लग्नासाठी तिला केलेले कपडे, सोन्याचे दाग दागिने, व घरातील 22 हजार असा लाख रुपयाचा येवज नेत पोबारा केला आहे. या प्रकरणी पतीने तिची मिसिंगची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.
ती अगोदरही विवाहित असून, तिने या आधीही असेच लग्न करून काहींना फसवल्याचा प्रकार घडल्याची शक्यता असल्याने याबाबतीत तपास करत अशा फसवणूक करणाऱ्या व यात मदत करणाऱ्या वर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.
