ज्ञानाचे धडे देणाऱ्या ज्ञानमंदिरातच फसवणुकीचा प्रकार
 बोगस भरती प्रकरणी १४ संस्था चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
बनावट कागदपत्रेद्वारे शासनाची फसवणूक
 श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील प्रकार 
नाशिक मिरर :
विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या  ज्ञानमंदिरात फसवणूक केल्याचे प्रकार समोर आला आहे. सातपूर कॉलनी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या संस्थेने बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून बोगस भरती केल्याप्रकरणी १४ संशयित संस्थाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका जिल्हा परिषद अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
     सामाजिक कार्यकर्ते चारुदत्त रामराव आहेर (वय ४०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संस्थाचालक बाळकृष्ण सावळीराम ढिकले (रा. सनरिच अपार्टमेंट, पारिजातनगर, बस स्टॉप, नाशिक), किसन कचरू जाधव (रा. प्रोफेसर कॉलनी, पंचवटी), रामनाथ नामदेव शिंदे, संपत दामोदर आहेर, नरेंद्र गंगाराम वाणी, बन्सीलाल वाळू रायते, सखाराम मुरलीधर पवार, शाळेचे लिपिक निवृत्ती रायाजी आहेर, ज्योती रतन गरुड (सातही रा. महाराष्ट्र हौसिंग कॉलनी, सातपूर) दादाजी सुखदेव शिंदे, (रा. अमिधारा अपार्टमेंट, सहावी योजना, दौलतनगर, अंबड लिंक रोड, सिडको), पंढरीनाथ कारभारी शिंदे (रा. गीता अपार्टमेंट, कॅनडा कॉर्नर), नारायण कोंडाजी पवार (रा. औदुंबर, सावरकरनगर, सातपूर), वैशाली वीर (नेमणूक जि. प. माध्यमिक विभाग, नाशिक), उदय देवरे (रा. समतानगर, मुंबई-आग्रा सं रोड), यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे करीत आहेत.

बातम्या

Don`t copy text!