गंगापूर रोड भागात व सातपूर मळे परिसरात अजून दोन बिबट्याचा वावर
नाशिक मिरर : सातपूर मळे परिसरात गेल्या बऱ्याच दिवसापासून तीन ते चार बिबट्यानी धुमाकूळ घातला होता. त्या अनुषंगाने तेथील नागरिकांनी वन विभागाला त्याबाबत माहिती दिली असता वनविभागा कडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी त्या पिंजऱ्यात एक बछडा अडकला परंतु मोठे बिबटे मोकाट असल्याचे सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून समोर आले होते. तसेच त्या बिबट्यांनी परिसरातील कुत्र्यांचा देखील पडश्या पाडल्याचे वेळोवेळी निदर्शनात आले होते. त्या अनुषंगाने वनविभागाने वारंवार बिबट्यांच्या वास्तव्याची पाहणी करून तशी रणनीती आखून पिंजरे लावण्यात आले. आज दिनांक १३ डिसेंबर रोजी त्या ठिकाणी अखेर एक बिबट्या जर बंद झाला आहे. एक विशेष बाब म्हणजे मळे परिसरातील एक वृद्ध महिला बिबट्या जर बंद झाला, त्या ठिकाणी बेलाच्या झाडाची पूजा नित्यनेमाने करीत असतात.
आज देखील सकाळी पहाटे त्या ठिकाणी पूजा करून परतत असताना हा बिबट्या जेरबंद झाला. परंतु देवाच्या कृपेने वृद्ध महिलेवर कोणत्याही प्रकारचा हल्ला चढवला नाही. ही एक आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. वन विभागाच्या अथक परिश्रमानंतर व वेळोवेळी पाठपुरावा करणारे निलेश भंदुरे यांनी वनविभागाचे आभार मानत अजून मोकाट असलेल्या बिबट्यांसंदर्भात जलद गतीने उपाययोजना करण्याचे आव्हान केले आहे.
सातपूर मळे परिसर व आज गंगापूर रोड वरील उच्चभ्रू वसाहती मधील रामेश्वर नगर, सिरीन मिडोज,केशर बंगल्या जवळ अजून दोन बिबट्या वावर दिसून आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
