नाशिक मिरर :
     सातपुर मधील ध्रुवनगर खंडोबा मंदिर परीसरात अज्ञात टवाळखोरानी तीन चारचाकी वाहनाची तोडफोड केली आहे.सदर घटना दि. ४ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे.
      सुभाष जाधव यांच्या घरासमोरील पार्किंग मध्ये लावलेली स्विफ्ट कार क्रमांक एमएच ०२ सीडब्लू ८९२२ या कारसह, गिरीश तिलनकर हुंडाई क्रमांक एमएच ४१ व्ही ५२६१ या गाडीची काच फोडली आहे. पाण्याच्या टाकी मागे अशोक काळे यांची स्कुल व्हॅन एमएच १५ एफव्ही ७०६५  या गाडीच्या दोन्ही काचा फोडण्यात आल्या, तर याच परिसरातील एका भाजी विक्रीच्या दुकानाचीही तोडफोड करीत या भागात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
   सदर घटना समजताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी पोलिस पथकासह पहाणी केली. टवाळखोरांचा होणारा त्रासा बाबत या भागातील महिलांनी, गंगापुरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, श्रीकांत निंबाळकर यांना कारवाई करण्यास सांगितले. 
या अगोदरही ध्रुवनगर, सातपूर कॉलनी, जाधव संकुल, परिसरात वाहनाची तोडफोड करण्यात आली होती.काही दिवसापूर्वी च परिसरातील दोन ठीकाणी धुडगुस घालणाऱ्या , टवाळखोरांवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी धडक कारवाई केली होती. सदर प्रकरणातही ते कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे  सरचिटणीस अमोल पाटील. मा. नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे यांनी केली आहे.
 
    वाहनाच्या काचा फोडतांना अज्ञात चार टवाळखोर सिकत्व सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले असून, काचा फोडत दहशत निर्माण करणाऱ्या या टवाळखोरांवर, लवकरच कारवाई होईल असही गंगापूर पोलीसांनी सांगितले आहे.

बातम्या

Don`t copy text!