सातपूर मध्ये या भागात पाणीपुरवठा होणार नाही !
नाशिक मिरर :  नाशिक महानगर पालिका हद्दीतील सातपुर विभागामधील शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्राजवळील १३०० मी.मी व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात अचानक गळती सुरु झाली आहे. यामुळे  लाखो लिटर पाणी वाया गेले.सदरच्या पाईप लाईनला शिवाजी नगर जलशुध्दीकरण केंद्राजवळ मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाल्याने तिचे दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेणे आवश्यक असल्याने, मनपा पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती चे काम हाती घेतले आहे.
         त्यामुळे सातपुर भागातील प्रभाग क्र. ९ मधील ध्रुव नगर जल कुंभ परिसर, धृव नगर, मोतीवाला कॉलेज परिसर, हनुमान नगर, संभाजी नगर, शिवशक्ती कॉलनी तसेच प्रभाग क्र. १० मधिल अशोक नगर, जाधव संकुल, समृद्धी नगर, वास्तु नगर, विवेकानंद नगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजी नगर, राधाकृष्ण नगर व इतर परिसर सातपुर विभाग प्रभाग क्र. ११ प्रबुद्ध नगर व इतर परिसर मध्ये पाणीपुरवठा होणार नाही अशी सूचना मनपा पाणीपुरवठा विभगाच्या वतीने नागरिकांना देण्यात आली आहे.

बातम्या

Don`t copy text!