नाशिक मिरर : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील नाशिक जिल्ह्यातील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपल्या कामगारांना भरघोस बोनस जाहीर केला आहे. महिंद्रा अँन्ड महिंद्रा एम्प्लॉइज युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात झालेल्या यशस्वी चर्चेनंतर दोन हजार कायम कामगारांना यंदा सेवाजेष्ठतेनुसार ७० हजार ६७५ ते १ लाख ३९ हजार २१३ रुपये बोनस मिळणार आहे. व्यवस्थापन आणि युनियन यांच्यातील यशस्वी चर्चेमुळे मागील वर्षापेक्षा आठ ते अठरा हजार रूपये सेवाजेष्ठतेनुसार जास्त बोनस मिळवून दिल्याचा दावा युनियनने केला आहे.याचा दोन हजार कायम कामगारांना लाभ मिळणार आहे.ज्या कामगार बांधवानचे मागील आर्थिक वर्षात हजेरीचे पुर्ण दिवस भरलेल्या सेवाजेष्ठतेनुसार कायम कामगारांना कमीत कमी ७० हजार ६७५ रूपये तर जास्तीत जास्त १ लाख ३९ हजार २१३ रूपये सोमवार (दि ६)रात्री सर्व कामगारांच्या खात्यात बोनस रक्कम जमा झाली असल्याचे युनियन तर्फे सांगण्यात आले आहे.महिंद्रा कंपनीच्या बोनसकडे औद्योगिक क्षेत्रातील तसेच बाजारपेठ सह सर्वांचे लक्ष लागून असते. बोनस बरोबर वेतनाची रक्कमही एकत्र मिळणार असल्याने कामगारांसह, त्यांच्या कुटूंबातही आनंदाचे वातावरण आहे. युनियनतर्फे अध्यक्ष एन. डी. जाधव, उपाध्यक्ष संजय घुगे, जनरल सेक्रेटरी संजय घोडके, सेक्रेटरी जितेंद्र सूर्यवंशी, जॉईंट सेक्रेटरी अजित थेटे, खजिनदार सचिन मोरे, सदस्य प्रकाश माळी, संतोष सावकार यांनी व्यवस्थासोबत यशस्वी चर्चा केली.
