न्याय देण्यासाठी  कैलास मोरे यांनी घेतला पुढाकार
नाशिक मिरर :
 सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये कार्यरत असलेल्या एका कामगाराची मशीनवर काम करतांना तीन बोटे तुटली असे असतांना जखमी कामगाराला वैद्यकीय मदत नाकारुन तसेच त्याचा छळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देणार्या मालकाविरुध्द कारवाई करुन न्याय मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा मंडळाला पिडीत कामगाराला न्याय देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
   अंबड  औद्योगिक वसाहतीत डी-८३ शौनक इंटरप्रायजेस या  कंपनीत कार्यरत कामगार राहुल पाटील रा.सातपूर अंबड लिंक रोड अशोका रो हाऊस याची तीन बोटे मशिनवर काम करत असतांना २४ एप्रिलला तुटली  मालक भरपाई देत नाही. ईएसआयसी कडे उपचार करण्यासाठी कागदपत्रे देखील देत नाही. या संदर्भात काही विचारपूस केल्यास दमदाटी करून दादागिरीची भाषा  करतो.दरम्यान  एक महिन्याच्या आत सगळे कागदपत्राची पुर्तता करतो असे सांगून तीन टाईमपास करत कोणतेही कागदपत्र दिले नाही.भरपाई नाही पगार नाही. पिडीताचे वडील गावावरून फोन करून कंपनी मालकास विचारपुस करतात त्यांना देखील मालक  सचिन चाफेकर  गुंडगिरीची भाषा वापरतो.
तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याने मालका विरोधात न्याय मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा मंडळाला निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्हा प्रमुख अनिल भडांगेसह पक्षाचे कार्यकर्ते  दिलीप पाटील,संजय तिवडे, छाया चौधरी, राहुल पाटील,चेतन पाटील आदी उपस्थित होते.
दुर्घटना झालेल्या राहुल पाटील यांच्या न्याय हक्कासाठी कंपनी मालकाने नुकसान भरपाई द्यावी व पिडीतास कामावर घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची पुर्ण जवाबदारी कंपनी मालकाची असते यासाठी महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास मोरे यांनी पिडीत राहुल पाटील यांची सोमवारी भेट घेवुन पेन्शन मिळवून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजना कार्यालयात जावुन कागदपत्र गोळा केली असुन कागदपत्राच्या आधारे कामावर जाण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान या प्रकरणात पिडीत पाटील यास न्याय मिळवून देणार असल्याने मालकास कायद्याचा धाक दाखवून नुकसान भरपाई व थकीत पगार व पुन्हा कामावर घेण्यास भाग पाडणार असल्याचे आणि अशा प्रकारचे अनेक पिडीतांना न्याय मिळवून दिला असल्याचे कैलास मोरे यांनी सांगितले.

बातम्या

Don`t copy text!