नाशिक मिरर :  सातपूर,अंबड व सिन्नर एमआयडीसी तील कामगारांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियनच्यावतीने औद्योगिक भवन समोर एक दिवसीय उपोषण करण्यात आले. या उपोषणला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
            बऱ्याच वर्षांपासून नाशिक मधील अंबड, सातपूर व  सिन्नर या एमआयडीसीमधील विविध कंपन्या मध्ये  कामगारांच्या जिवाला धोका पोहचेल अशा प्रकारे कामकाज सुरू आहे.मोठ्या प्रमाणात कारखान्यामध्ये औद्योगिक सुरक्षा विषयी चे नियम पाळले जात नाही.त्यामुळे कामगारांचे अपघात होऊन कामगारांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व येते.प्रत्येक कंपनी मध्ये अग्निरोधक प्रणाली बसविण्यात यावी. कामगारांना सुरक्षा विषयक साधने बूट, गॉगल्स,हँडग्लोज, आदी देण्यात यावे, कंपन्यांनी बाहेर सांडपाणी रस्त्यावर सोडू नये, मशीन ला सेप्टि गार्ड असावीत,धोकादायक रसायने योग्य रीतीने हाताळण्याचे प्रशिक्षण कामगारांना देण्यात यावे,उच्च तापमानच्या ठिकाणी काम करताना व उंची वर काम करताना आवश्यक सुरक्षा साधने पुरवण्यात यावी आदी मागण्या साठी छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियनने  विविध कंपन्यांच्या विरोधात कामगारांचे आरोग्य व सुरक्षा पाळले जात नसल्याबाबत चे  पुरावे गोळा करून व महाराष्ट्र शासनाचे आरोग्य व सुरक्षा संचानालय मध्ये तक्रार नोंदवून देखील अधिकारी कोणत्या प्रकारची कारवाई करत नाही. स्थानिक कामगारांना ८०% नोकऱ्या देण्यात याव्या. तसेच इतरही कामगारांच्या प्रश्नांसाठी छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियन कडून एक दिवसीय उपोषण करण्यात येणार होते.परंतु कंपनी मालकांकडून हे उपोषण थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले.तसेच अंबड व सातपूर पोलीस स्टेशन कडून कलम १४९  खाली संघटनास  नोटिसा पाठविण्यात आल्या.
     पाठपुराव्या मुळे दि २६  रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास भवन मधील कार्यकारी अभियंता यांनी छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियन सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या.मागण्यासाठी छत्रपती युवा सेनेचे गणेश कदम, शिवसंग्राम सेनेचे शरद तुंगार, छावा मराठा युवा संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदू पगार, विश्व हिंदू महासंघ भारतचे मंगेश ठाकूर,महाराष्ट्र मंत्री स्वानिती बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष निलोफर शेख या संघटनांनी छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियन च्या मागण्यांना पाठिंब्याचे पत्र दिले.
   याप्रसंगी छावाचे जिल्हाध्यक्ष शंकर फडोळ,आशिष कुशवाह, रोहन सिंगर,प्रदेशाध्यक्ष रशीद भाई सय्यद,जावेद शेख, संतोष चव्हाण,निलोफर शेख, गायकवाड  आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!