नाशिक मिरर : मुंबईस्थित धडक कामगार युनियनने सातपूर,अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपनी व्यवस्थापणाशी बैठकी संदर्भात पत्र व्यवहार केला आहे. विशेष म्हणजे ज्या कंपनीत युनियनचा काही संबंध नाही. कोणी सदस्य नाही, अथवा युनियन च नाही.तरी अश्या कंपनी व्यवस्थापनाला बैठकीचे पत्र दिल्याने त्या कंपनी व्यवस्थापण प्रतिनिधिंनी सातपुर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
सातपुर अंबड औद्योगिक वसाहतीतील शेकडो कारखाने आहे. बहुतांश कंपनी कामगारांनी विविध पक्ष – संघटनाचे प्रतिनिधित्व स्वीकारत कंपनीवर झेंडे फडकवले आहे. वेतनवाढ, बोनस, कामगारांच्या तक्रारी विविध प्रश्नासंदर्भात या युनियन प्रतिनिधी व व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यात बैठक होणे क्रमपात्र आहे. मात्र ज्या युनियनचा कंपनी सोबत कुठलाही संबंध नसताना बैठक आयोजित करणे हे बेकायदेशीर आहे. असे असतांना मुंबईस्थित धडक कामगार युनियनने सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीत सूप्रसिद्ध सीएट, ग्लेनमार्कसह विविध कंपनी व्यवस्थापणाशी बैठकी संदर्भात पत्र व्यवहार केला आहे. याविरोधात या. कंपनी व्यवस्थापनाने सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांची भेट घेत कैफियत मांडली. दरम्यान, मोरे यांनी धडक कामगार युनियनच्या प्रमुखांशी भ्रमनध्वनी वरून संपर्क साधत, नाशिक शहरात कलम १४४ लागू असून त्याचे उल्लंघण झाल्यास गुन्हे दाखल करणार आल्याची ताकीत दिली आहे.
