सातपूर : नाशिक मिरर वृत्तसेवा विविध प्रकारचे कॅपॅसिटर निर्मिती करणाऱ्या टीडीके कंपनीती कामगारांना दिवाळीचा बोनस जाहीर झाला आहे. सेवा जेष्ठतेनुसार ६५ हजार ते ७५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. कंपनीची प्रतिकूल परिस्थिती असताना कंपनीने ५२५ कायम कामगारांना सेवा जेष्ठतेनुसार बोनसचा लाभ देण्यात आला आहे. बोनस करार यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने हरिशंकर बॅनर्जी, प्रबळ रे, योगेश साठे,मनीष बोरस्कर, विवेक झनकर
युनियनच्या वतीने अध्यक्ष डॉ. डी.एल कराड, उपाध्यक्ष सिताराम ठोंबरे, चिटणीस संतोष काकडे,
कमिटी सदस्य अमर शेवकर, बाळासाहेब सोनवणे, संदीप गटकळ, संदीप दाभाडे, प्रणव पटेल, सचिन बोरसे, जितेंद्र पाटील, चंदू पाटील यांनी सहभाग घेतला होता.
