नाशिक मिरर वृत्तसेवा :
औद्योगिक वसाहतीतील टायर निर्मिती करणाऱ्या सीएट कंपनीतील कामगारांना दिवाळीचा भरघोस बोनस जाहीर झाला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार सीएट मधील कायम कामगारांना कमीत कमी ६५ हजार ते ७५ हजार रुपये बोनस जाहीर होत खात्यात जमा झाला आहे.यामध्ये
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांचाही समावेश आहे.टायर उद्योगात उत्पादन व मागणी यात प्रतिकूल परिस्थिती असताना कंपनीने या वर्षी २४०कामगारांना कायम केले आहे.कंपनी व्यवस्थापन व सीटू प्रणीत मुंबई श्रमिक संघ कामगार युनियन यांच्यात सकारात्मक चर्चा होत कायम ११०० कामगारांना सेवाज्येष्ठतेनुसार बोनसचा लाभ देण्यात आला आहे.
याचबरोबर व्हीआरएस घेतलेल्या नवीन कायम झालेल्या कामगारांनाही या बोनसचा लाभ मिळणार आहे. व्यवस्थापनाच्या वतीने मनुष्यबळ विकास प्रमुख घ्यानचंद गौतम, जयशंकर , व्हाईस प्रेसीडेन्ट विनय जोशी, एच आर असीम जोशी,युनियन वतीने अध्यक्ष गोकुळ घुगे,सरचिटणीस कैलास धात्रक,उपाध्यक्ष अशोक देसाई, मनोज शेट्टी, खजिनदार संपत लोणकर,आद्य शंकर यादव, वाल्मिक भडांगे, बिजू जॉन, विजय सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
