नाशिक मिरर वृत्तसेवा :  नवरात्र उत्सवाच्या प्रारंभाच्या दिवशीचं दुचाकी वरील युवकांचा रिक्षा मधून पाठलाग करत, श्रमिक नगर येथील धात्रक चौकात जीवघेणा हल्ला करणाऱ्या,व चारचाकी वाहने व घरावर दगडफेक करणाऱ्या टवाळखोरांना सातपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.मिलिंद (मोना )पाटील, पियुष दीक्षित, ललित सूर्यवंशी,विकास महाले,संदीप ठाकरे,ओम सोनार , मिलिंद पाटील असे अटक करण्यात टोळक्यातील संशयितांची नावे आहे. गुरुवारी (दि. ३) अतुल खरे युवकास या टोळक्याने सिनेस्टाईल मारहाण करत जबर जखमी करत परिसरात दहशत पसरवली होती.

 दरम्यान, या टोळक्यातील आरोपींना शोधण्याचे आव्हान सातपूर पोलिसांपुढे उभे ठाकले होते. गुन्हे शोध पथकाचे सागर गुंजाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सापळा रचत या टोळक्यातील संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या. मागील भांडणाच्या कुरापतीतून हा वाद झाल्याचे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सांगितले.

           शनिवार दि.५ ऑक्टोबर रोजी सायं ६ वा टवाळखोरांची ओळख परेट करत श्रमिक नगर,हिंदी शाळा, धात्रक चौक,सात माऊली चौक, खंडेराव महाराज चौक या भागातून दिंड काढण्यात आली, यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भर चौकात लाठ्या काठ्या, कोयते घेऊन मारहाण करणाऱ्या या नऊ टवाळखोरांच्या मुस्क्या आवळण्यात ४८ तासात सातपूर पोलिसांना यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच ज्या परिसरा त युवकाला गंभीर मारहाण करत जीवघेणा हल्ला केला होता, त्याच परिसरातून या टवाळखोरांची दिंड काढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये, पोलिसांविषयी समाधानाचे वातावरण दिसून आले. दरम्यान सातपूर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करत, परिसरातील नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य, करण्याची गरज असल्याचे यावेळी शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी सांगितले.सातपुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राहुल नळकांडे, दीपक खरपडे, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ, अनिल आहेर आदींनी या टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी बजावली.

 

Don`t copy text!