पाणी निचराची व्यवस्था व भूखंडची सफाई करण्याची मागणी
नाशिक मिरर : येथील राज्यकर्मचारी वसाहत , अशोकनगर, राम नगर, सावरकरनगर येथील पावसाचे पाणी हे निलकंठश्वर मंदिरापासून वाहत येऊन लोहोटी मळा परिसरात जमा होत आहे. त्यामुळे लोहोटी नगर मध्ये तलाव सारखे पाणी साचत आहे. पावसाचे पाणी साचून पाण्यात डेंग्यू डास, साप देखील आढळून येत आहे.
त्यामुळे सदर पाण्याचा निचरा करण्यासाठी मनपा प्रशासनाने त्वरित व्यवस्था करावी. तसेच राजश्री पार्क मधील मोकळ्या भूखंड आहे.सदर ठिकाणी कचऱ्या टाकला जात असून, मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. सदर मोकळ्या भूखंडाची सफाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी याबाबत निवेदन सातपूर विभागीय अधिकारी नितीन नेर, बांधकाम उपअभियंता कोल्हे यांना देण्यात आले आहे.यावेळी अरुण मौले, महेंद्र जगताप, रवींद्र पाटील,वाल्मिक पवार, सुरेश जाधव, सुरेश आवारे, सुधीर सोनवणे आधी सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
