ध्रुवनगर मधील दुर्देवीघटना ;श्रमिकनगर शोकाकुल 

नाशिक मिरर : वृत्तसेवा नाशिक मधील सातपूर भागात ध्रुवनगर येथील, एका बांधकाम साईट वर इमारतीला पेंटींग (रंगकाम) करणाऱ्या, दोन कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ध्रुवनगर येथील मधुलक्ष्मी हाईट्स या खाजगी बांधकाम साईटवर, इमारतीला मंगळवार रोजी सायंकाळ सुमारास,तुळशीराम माळी, वय ४० वर्ष,राहणार श्रमिकनगर. हे लाकडी झुल्या वर बसून तिसऱ्या मजल्याला रंग काम करत होते. सदर झुल्या ची दोरी टेरेस वरून, विवेक कुमार, वय २६ वर्ष.मुळ रा. बिहार, सद्या रा.श्रमिकनगर याने पकडली होती. परंतु विवेक यांची दोरी वरील पकड निसडली.

 

तुळशीराम माळी

यामुळे विवेक चा तोल गेल्याने, विवेक सह, तुळशीराम हे खाली जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले. सदर घटनेत विवेक कुमार यांचा जागेवर मृत्यू झाला.तर तुळशीराम माळी यांचा खाजगी रुग्णालयात दिनांक १२ रोजी. उपचार दरम्यान सकाळी मृत्यू झाला. तुळशीराम माळी हे, गेली वीस वर्षापासून पेंटिंग चा व्यवसाय करत होते. श्रमिक नगर मधील संत सावता माळी मंडळ व क्रांतीसूर्य फाउंडेशन चे सदस्य होते.

बातम्या

Don`t copy text!