नाशिक मिरर वृत्तसेवा :

 

          नाशिक शहर व जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दृदैवी घटना घडल्या आहेत,पाच जणामधील एक जण वाहत जाऊन बेपत्ता झाला होता.तो आज ८ सप्टेंबर रोजी. पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर पुला जवळ नदीच्या किनाऱ्यावर डेटबॉडी सापडली आहे. मागील काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने, नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश धरणे व बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, विसर्जन दिवशी नदी, नाल्यांना पूर आला होता. पाण्याच्या वेगवान प्रवाहात बुडून पाच गणेशभक्तांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदवली येथे शनिवारी (दि. ६)सायंकाळच्या सुमारास नदीच्या प्रवाहात दोघे गणेशभक्त वाहून गेल्याची घटना घडली होती. यातील एक जण पोहून बाहेर आल्याने तो बचावला. तर दुसरा युवक पाण्याच्या प्रवाहात वाहनू गेला असून, अद्याप त्याचा शोध लागलेला नव्हता. रविवारी (दि. ७) सकाळी अग्निशमन दलाकडून बेपत्ता युवकाचा पुन्हा शोध घेण्यात आला. मात्र, त्यात यश आले नाही. प्रवीण शांताराम चव्हाण (२५, चाळीसगाव, जि. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.प्रवीण हा सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये ४ महिन्या पूर्वी च कामाला लागला होतो. सातपूर कॉलनी मध्ये बॅचलर राहत होता.

 

 दूसरी घटना म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या दगडी खाणीत घडली. शनिवारी (दि. ६) दुपारी तीन वाजता चंदर नथू माळेकर (२९, रा. म्हसोबावाडी, बोरगड) हा गणपती विसर्जनासाठी विद्यापीठालगतच्या तलावात उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबत, म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

तिसरी घटना सिन्नर येथे घडली. सिन्नर शहराजवळ असणाऱ्या सरदवाडी धरणात ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (४० रा. सिल्व्हर लोटस स्कूलजवळ, सिन्नर) हा विसर्जनासाठी पाण्यात उतरला असता, पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

 

 चौथी घटना कळवण तालुक्यातील मौजे देसराणे येथे पुनद नदीत घडली. गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दिनेश बाबूराव राजभोज (३९) यांचा पात्रालगत असलेल्या फरशीवरून पाय घसरून ते नदीपात्रात पडले. नदीला प्रवाह जास्त असल्याने, बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सापडला असून,

 

 पाचवी घटना नाशिक तालुक्यातील गोवर्धन शिवारात गडली. विष्णू डगळे (३४, रा. गंगापूर) यांचा गोदावरी नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला.

Don`t copy text!