नाशिक मिरर वृत्तसेवा: देवळा
कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्वच्छ हवेच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. “पर्यावरण जाणीव, शाश्वत उपाय आणि हरित पद्धती” या विषयावर हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही. के. वाहूळे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. डी. एम. सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्वच्छ हवा ही आरोग्य व समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षलागवड, हरित पद्धती आणि शाश्वत उपाययोजना स्वीकारणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर उपस्थित होते.यांनी युवकांनी पर्यावरण संवर्धनाचे दूत म्हणून काम करावे, असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. डी. के. आहेर, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. जयवंत भदाणे, डॉ. एस.डी. ठाकरे, प्रा.व्ही. डी काकविपुरे, डॉ. संजय बनसोडे, प्रा. चंद्रकांत दाणी, प्रा. बादल लाड महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर आभारप्रदर्शन प्रा. आर. जे. पगार यांनी केले.
