रात्रभर डांबून सकाळी सोडले,   एवढ्या मोठ्या कारवाईवर संशय

नाशिक मिरर वृत्तसेवा : किरकोळ वादातून एका यूट्युब न्यूज चॅनलच्या पत्रकाराला सातपूर पोलिसांनी दबंगगिरी करत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसतांना, एका दहशतवादी सराईत गुंडाप्रमाणे थर्ड डिग्रीचा वापर करून रात्रभर डांबून ठेवल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांनी घटनेची माहिती घेऊन संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्या वर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

 

   जाधव संकुल येथे राहणारे युट्यूबचे चॅनल चे पत्रकार तुषार ढेपले यांचा त्यांच्या शेजाऱ्यांसोबत किरकोळ वाद झाला होता. या वादाची माहिती 112 या पोलिस हेल्पलाईनवर दिल्यावर सातपूर पोलीस ठाण्याचे पथक त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यावेळी तक्रारदारही तिथे हजर असल्याने त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली.याच रागातून ठाणे अंमलदाराने ढेपले यांच्या श्रीमुखात भडकावून त्यांना आतल्या खोलीत नेले. तिथे एका उपनिरीक्षकासह इतर पोलिसांनी तु नेहमीच पोलिसांच्या विरोधात बातम्या दाखवतो काय?’ असा जाब विचारत एकाने दोन्ही पायावर त्याचे दोनही पाय ठेवून गुरा ढोरासारखी गिरणीच्या पट्ट्याने हाता-पायांवर हाडावर बेदम मारहाण केली.

 

दरम्यान पोलिसांनी सारवासारव रात्री अडीच वाजता कोणतीही कारवाई न करता ढेपले यांना सोडून देण्यात आले.सकाळी सातपुरच्या सर्वच पत्रकार संघटनांनी या प्रकाराबद्दल जाब विचारल्यावर पोलिसांनी सारवासारव करत तब्बल ढेपले यांना नोटीस बजावल्याचे समजते. पोलिसांनी केलेल्या या कृतीचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. पत्रकार संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. पोलीस हवालदार गवळी,शिरसाट सांगतात तो नशेत होता तर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल करायचा होता.या घडलेल्या प्रकाराची सर्व पत्रकारांनी निषेध व्यक्त करत पोलिसांना मारहाण करण्याचा अधिकार दिला कोणी असा संतप्त सवाल केला ?

 

या प्रकरणातील मारहाण करणाऱ्या राकेश न्हाळदे उपनिरीक्षकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. याप्रकरणात पोलीस आयुक्त काय कारवाई करणार याकडे पत्रकाराचे लक्ष लागले आहे.

बातम्या

Don`t copy text!