दुचाकी चालकासह मदत करणाऱ्याना बेदाम मारहाण
सातपूर : नाशिक मिरर वेबटीम
सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सुनील ट्रान्सपोर्ट समोर रॉंग साईटने भरधाव वेगाने मोपेड गाडीवर येणाऱ्या युवकांनी एका कामगारांस धडक दिली. यावरून रॉंग साईटने का आलास असे विचारले म्हणून अज्ञात टवाळखोरांनी दुचाकी जाळून वाहनचालकासह मदतीला आलेल्या तीन व्यक्ती ना बेदाम मारहाण केल्याचा घटना दि.७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे. यामध्ये जखमी व्यक्तीना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की संकेत कासार (वय २६ रा. वासळी गाव) हे आपले चुलते ज्ञानेश्वर कासार यांची टिव्हीएस स्टार ( एमएच १५ बीव्हाय १२३१) वरून सिएट कंपनीत काम करून साडेपाच वाजेच्या दरम्यान दुचाकीने घरी चालले होते.समोरून रॉंग साईटने भरधाव येणाऱ्या मुलाने धक्का दिला. यावरून संकेत याने रॉंग साईट ने का आलास असे अज्ञात मुलास विचारले असता त्याने वाद घालून संकेत यांस मारहाण केली. व त्याची दुचाकी देखील पेटवून दिली. अज्ञात टवाळखोर मुलाने अन्य ५ ते ६ साथीदाराना बोलावून घेतले होते. सदर प्रकार भररस्त्यात घडत असल्याने एका स्कार्पिओ वाहनातून नागरे कुटुंबातील ३ व्यक्तीनी वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती केली परंतु सदर टवाळखोरांनी वाहनचालक सह मदतीस आलेल्याना बेदाम मारहाण केली. यामध्ये सर्वजण जखमी झाले असून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती समजताच मनपाचे अग्निशमन वाहनाने दाखल होत कर्मचारी नी गाडीची आग विझवली.घटनास्थळी सातपूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी पाहणी करून सर्व आरोपीना अटक करून कारवाई करणार असल्याचे यावेळी सांगितले.सदर संशयित हे परिसराजवळील प्रबुद्धनगर मधील असल्याचा संशय असून घटना दरम्यानची व्हिडिओ व फोटो मध्ये सदर आरोपी दिसत असल्याने टवाळखोराना अटक करण्यात मदत होणार आहे.
