नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर  छत्रपती शिवाजीनगर परिसरातील अभिषेक बेकरीमध्ये दिनांक १३ सप्टेंबर शनिवार रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीमध्ये बेकरीतील साहित्य, यंत्रसामग्री, कच्चा माल व तयार माल जळून खाक झाला असून अंदाजे करोडोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.

 याह घटनेची माहिती अग्निशामक दलाला देताच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यासाठी सातपूर, अंबड एमआयडीसी, सिडको व सातपूर एमआयडीसी येथील सहा ते सात बंब मागवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बेकरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने मालक व कामगार वर्गावर आर्थिक संकट ओढावले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. सकाळच्या वेळी ही घटना कल्याणी मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण आणले.

बातम्या

Don`t copy text!