जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची आमदारकी जाहीर झाल्याने उत्साहाचे वातावरण

नाशिक मिरर वेबटीम : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या रुपाने नाशिकला आणखी एक आमदार मिळणार आहे. राज्यपाल नियुक्त बारा ल आमदारांच्या यादीत विजय करंजकर यांच्या नावाचा समावेश करण्यात आल्याने जिल्ह्यातील शिवसेनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.भगूरची नगरपालिका तब्बल वीस वर्षांपासून ताब्यात ठेवलेल्या करंजकर यांना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत डावलण्यात आले होते. त्यामुळे आमदारकीच्या रुपाने त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  व सेनेने निष्ठेचे फळ दिले आहे.  अशी जनभावना जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकाची  झाली आहे . खरं तर यांना आमदारकी जाहीर झाल्याने जिल्ह्यातील  शिवसैनिक अधिक जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले. आगामी महानगरपालिका निवडणुका बघता  राज्यात असलेली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस  महाआघाडी सत्ता असल्याने शिवसैनिक अधिक जोमानेे कामाला लागल्याचेेेे दिसून येत आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना अखेर राज्य सरकारच्या वतीने आज १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या यादीत शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर तर भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रत्येकवेळी संधी हुकलेल्या करंजकर यांना शिवसेनेने अखेर निष्ठेचे फळ दिल्याची भावना व्यक्त होत आहे.

बातम्या

Don`t copy text!