नाशिक मिरर वेबटीम : अंबड लिंक रोडवर सिडको ला जोडणारा शिवरोड केवल पार्क येथे रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत ५ दुकाने जळून पूर्ण खाक होत अंदाजे ५० लाखांचे नुकसान झाले आहे.केवल पार्क अष्टविनायक नगर येथे असलेल्या आटोमोबाईल दुकान,गॅरेज, हार्डवेअर , पेपर वर्क असलेल्या पाच दुकानात रविवारी रात्री साडेबारा च्या दरम्यान आग लागली.रात्री एक च्या दरम्यान सातपूर ,सिडको,अंबड औद्योगिक वसाहत ,मुख्यालय येथील ५ अग्निशमक बंब यांनी ६ खेपा करीत दोन तासात आग आटोक्यात आणली आहे.या आगीत यशवंत ऑटो सेंटर यांच्या दुकानातील दुरुस्ती साठी आलेल्या चार फोर व्हीलर, सह कल्पतरु हार्डवेअर, एजिके इंट रप्राईजेस,ग्लो साइन बोर्ड,ओम आर्ट,या दुकानातील साहित्य ५० लाखाचे साहित्य जळाले. सातपूर केंद्र प्रमुख प्रदीप परदेशी, ताराचंद सुर्यवंशी, संजय घाटे,अशोक पोरे,रमाकांत खारे, यानी आग विझवण्यात प्रयत्न केले.

बातम्या

Don`t copy text!