नाशिक मिरर वेबटीम : नाशिक शहराला स्मार्ट सिटी चा दर्जा प्राप्त करायचा असेल तर वाहतूक सुरक्षे वर काम करावे लागेल .हे ध्यानात घेऊन गरुडझेप प्रतिष्ठान गेली १ हजार दिवसापासून नाशिक शहरात विविध ठिकाणी वाहतूक सुरक्षा प्रबोधन करत आहे . शहरातील प्रमुख चौक व सिग्नल येथे रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात आले.त्यांच्या ह्या सामाजिक कार्याची दाखल जागतिक विक्रमात हि झाली आहे . डॉ संदीप भानोसे ह्यांच्या कार्यातून ध्येय निश्चिती , नियोजन ,चिकाटी , निस्वर्थ्पणा व सातत्य प्रकर्षाने जाणवते . इतर सामाजिक संस्थांनी सुधा ह्या कार्यातून प्रेरणा घ्यावी .असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ ह्यांनी केले . भुजबळ ह्यांनी डॉ संदीप भानोसे ह्यांचा सत्कार करून जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात .
गरुडझेप प्रतिष्ठान गेली १ हजार दिवस अर्थात २५ मार्च २०१८ ते १९ डिसेंबर २०२० नाशिकला विविध ठिकाणी वाहतूक सुरक्षा अभियान सातत्यपूर्ण रीतीने राबवत आहे .आज पर्यंत अनेक शाळेत व कॉलेजात सुधा डॉ संदीप भानोसे ह्यांनी व्याख्याने दिली आहेत .हळू हळू समाजात परिवर्तन होताना दिसत आहे . हेल्मेट वापर वाढला आहे .वाहतूक नियम पाळण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच अपघातात सुधा मोठी घट झाली आहे .आता पर्यंत गरुडझेप प्रतिष्ठाने २५१ , ३६५ , ५५० , ७०० , ९०० व आता १००० दिवसांचे जागतिक विक्रम रचले आहे . भविष्यात आता २००० दिवसांचे लक्ष्य डॉ भानोसे यांनी समोर ठेवले आहे. गरुडझेप प्रतिष्ठानचे रेणू भानोसे , संकेत भानोसे , पत्रकार अजिंक्य तरटे , रवींद्र व सुरेंद्र कुलकर्णी , योगेश अहिरे , अविनाश क्षीरसागर ,अंजना प्रधान , सागर बोडके ,प्रसाद देशपांडे , रवींद्र कापडणे ,रमेश शिंपी , रतन भावसार , अशोक कुमावत व अजित उपाध्याय ह्यांनी सहयोग दिला .विवेकानंद केंद्र चे अमोल अहिरे , उद्योम रेडीओ चे संतोष पाटील , जया व वसंत कुरूप ( केरला सेवा समिती ), समीर भडांगे ( DSF ) , योगेश बर्वे व रोहित कानडे ( नवनाथ पंथीय संस्था ) , राजू रुपवते ( रॉयल रायडर्स ) ,अनिल वराडे , संजय पवार व झाकीर भाई पठाण ( नासिक सायकालीस्त ),गिरिदुर्ग परिवाराचे दिलीप गीते , मनोज गोराणे,डॉ प्रकाश पवार , राजंद्र गणोरे व मिलिंद बोटेकर ह्यांनी वाहतूक सुरक्षा अभियानात सहभाग नोंदविला व गरुडझेप संस्थेला शुभेच्छा दिल्या .
