नाशिक मिरर :
सातपूर औद्योगिक वसाहती मधील सुप्रीम ऑटो सेल इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनी मधील ५५ कामगारांनी संपूर्ण कुटुंबियासह गेट समोर काम बंद आंदोलन करून कंपनी व्यवस्थापणाच्या अन्याय विरोधात घोषणाबाजी केली. कामगारांचा गेल्या ९ महिन्या पासून रखडलेला पगारवाढ करार, तसेच करार मध्ये नमूद केलेल्या बाबी व घटना ची अंमलबजावणी न करणे आदी मागण्यांसाठी सोमवार दि.६ जून रोजी आंदोलन केले. कंपनी मालकाने पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून कामगार व कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीनी सातपूर पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न गेला.
२५ मे रोजी कंपनी व्यवस्थापन व कामगार व युनियनचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती.यावेळी करार झाला होता. त्याची कंपनी व्यवस्थापनाकडून अंमलबजावणी होत नसल्या कारणाने गेट समोर आंदोलन करण्यात आल्याचे कामगारांनी यावेळेस सांगितले. वरील ५५ कामगार सुप्रीम वर्कर्स युनियन सी .आय .टी. यु सलग्न आहेत. या आंदोलनाच्या वेळेस सिंधु शार्दुल, कल्पना शिंदे,अण्णा त्रिभुवन, मोहन पाटील, महेंद्र ढोमसे, भाऊसाहेब पाटील, तात्या झाल्टे, संदीप सोमासे, व इतर उपस्थित कामगारानी माहिती दिली. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी आंदोलकाना ताब्यात घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्याना दिल्या.


