नाशिक मिरर : गुरुवारी झालेल्या पाऊसामध्ये जुना प्रभाग १० व नवीन प्रभाग रचनेनुसार प्र. क्र. १२ मधील शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी, ध्रुवनगर आदी भागातील नागरिकांना गटाराचे चेंबर तुंबल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यातुन वाट काढावी लागली.तर अनेक ठिकाणी पाण्याचे तलाव साचले होते. सदर समस्या बाबत सातपुर विभागीय अधिकारी यांसह संबंधित विभागाचे अधिकारी यांना हेमलता कांडेकर, सविता गायकर, सदाशिव माळी, प्रमोद जाधव ,बाळा जारे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही पावसाळी गटार नाले यांची डागडुजी व ड्रेनेज साफ न केल्यामुळे पहिल्याच पावसाने सदर भागात नागरिकांचे हाल केले.
रसायंकाळी झालेल्या पाऊसाने अनेक नागरिकांच्या घरांमध्ये गटाराचे पाणी शिरल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
धर्माजी कॉलनी च्या कोपऱ्यावर नैसर्गिक नाल्यावर अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे त्या ठिकानावरून वाहून जाणारे पाणी साचून तलावाचे स्वरूप मुख्य रस्त्याला आल्याचे दिसून आले.गाजरे हॉस्पिटल च्या पाठीमागे ड्रेनेज फुटल्याने त्या ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन आजूबाजूच्या लोकांचा आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. पुढील आठ दिवसाच्या आत हे सर्व नाले, ड्रेनेज, गटार साफ झाले नाही तर या ठिकाणी नाले तुंबून जे काही सांडपाणी जमा होईल ते पाणी थेट मनपा आयुक्तांच्या दालनात टाकून आंदोलन केले जाईल. असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे.सातपुर विभागीय अधिकारी नितीन नेर आणि बांधकाम विभागाचे अधिकारी कोल्हे यांची तात्काळ बदली करण्यात यावी. माजी नगरसेवकाच्या आदेशाने अधिकारी उलटे-पालटे काम करत असल्याचे दिसत असल्याचे आरोप करण गायकर, मा. नगरसेविका हेमलता कांडेकर, सदाशिव माळी, दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, हेमलता कांडेकर, सविता गायकर, बाळा जारे, सम्राट सिंग, महेश आहेर,नवनाथ शिंदे, गिरीश आहेर, अविनाश गायकर, प्रीतेश पाटील, किरण बोरशे, गणेश वाघचौरे, वैभव दळवी यांनी केला असून त्वरित समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
