नाशिक मिरर वृत्तसेवा: शिवकाळा पासून नाशिक जिल्ह्यातील किल्ले रामशेज आपले शिवकालीन अस्तित्व टिकवून आहे. व ते या पुढेही असच असावं यासाठी किल्यावर कायम स्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी नाशिक चे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.किल्ल्या वर अनेक पर्यटक, शिवप्रेमी येत असतात ,काही गैरवर्तणूक करताना दिसून येतात, हे चुकीचे प्रकार कुठेतरी थाबावेत, या साठी स्वराज फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य यांनी कायमस्वरूपी किल्ल्यावर सुरक्षा रक्षक नेमावा या साठी नाशिक येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केली.
या वेळी संस्थापक अध्यक्ष अतिश शार्दुल, निफाड तालुका अध्यक्ष हर्षद आहेर, सोमा जुगृत,त्रुषी डुंबरे, सुदर्शन आहेर,किरण जगदाळे, नितीन सानप, कृष्णा जुगृत आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!