ऑटो रिक्षा व दुचाकीचे नुकसान
सातपूर : नाशिक मिरर वृत्तसेवा। सातपूर मधील महादेव नगर मध्ये टवाळखोर गुंडाची मोठ्या प्रमाणात दहशत दिसून येत असून याकडे सातपूर पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी यांचे दृलक्ष झालेले दिसून येत आहे. महादेव नगर मधील आॅटो रीक्षा, दुचाकी तोडफोड,व नुकसान अज्ञात टवाळखोरांनी केली आहे. राजु सोनवणे हे फळविक्रेते असून,त्यांची रीक्षा एमएच १५ एएस ९६७१ या क्रमांकची रिक्षा घर बाहेर लावलेली होती.रात्रीच्या वेळी अज्ञात गुंडांनी बाहेरुन दाराची कडीलावून रीक्षाची पाठीमागच्या बाजुनी पुर्ण कवर फाडले, आत मध्ये शीट फाडले. तसेच दुचाकी चे मागचे शिट फाडले, व तोडफोड केली. यामुळे रिक्षा वर पोट भरणारे सोनवणे यांचे फार नुकसान झाले आहे.सदर घटनेची तक्रार सातपुर पोलिस ठाणे मध्ये नोंदविण्यात अली आहे. यापूर्वी देखील यांच परिसरात महादेव मंदीरा शेजारी रिक्षा जाळण्याचा प्रकार घटना होतो.तसेच दुचाकी देखील जाळली होती. आरोपी सापडत नसल्यामुळे महादेव नगर जनसेवक समितीच्या वतीने विजय अहिरे,सुनील मौले,भारत भालेराव,संजय तायडे,अविनाश मौले,प्रवीण भवर, सुनील गुंजाळ आदी जलद कारवाई करण्याची मागणी सातपुर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या कडे केली आहे.
