नाशिक मिरर : येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडी व विश्व क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्ताची हिमोग्राम प्रोफाईल चाचणी करण्यात आली.
अशोकनगर येथील शिवसेनेच्या पश्चिम विधानसभा संघटक नरेश सोनवणे व विश्व क्लिनिक अँड रिचर्स सेंटरच्या संचालिका डॉ. वृषाली नरेश सोनवणे यांच्या सौजन्याने आयोजित २५० पेक्षा जास्त महिलांची मोफत हिमोग्राम प्रोफाईल चाचणी करण्यात आली.
या प्रसंगी सीमा निगळ,नयना गांगुर्डे, हर्षदा गायकर या नगरसेविकासह महिला आघाडीच्या अलका गायकवाड,सविता गायकर,निवृत्त मुख्याध्यापिका सुलोचना गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुचेता कुरहे यांनी महिलांसाठी गीत सादर करुन रंगत आणली.
कुटुंबाचे स्वास्थ अबाधित आणि आनंदीत राखण्यासाठी घरातील कर्त्या स्त्री ने देखील निरोगी राहुन स्वताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये.असा सल्ला देत रक्त्तातील घटकाची सखोल माहिती डॉ.सोनवणे यांनी विषद केली.
सुत्रसंचालन विजय बुरकुल यांनी केले.आभार अलका गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीततेसाठी मेट्रो वर्ल्ड लॉब, सोनल भालेराव,पल्लवी अवसरकर,संगीता पगार,मंदा जाधव, पुर्वा निकुंभ,ज्योत्स्ना जाधव,मनिषा भागवत,देवकी आहिरे आदिनी परिश्रम घेतले.
