नाशिक मिरर : राजू अनमोला सातपूर प्रतिनिधी

नाशिक मनपा स्थानिक स्वराज्य संस्थे ची फेब्रुवारी २०२२ मध्ये संभाव्य होणाऱ्या निवडणुकीसाठी सातपूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने इच्छुक उमेदवाराची चाचपणी बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

निवडणूक अवघ्या काही महिन्या वर आली असल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने सातपूर विभागात, एक पाऊल पुढे येत निवडणुकीसाठी बैठकांची सुरवात करण्यात आली आहे. विभागात पक्ष संघटनेची एकत्र मूठ बांधत जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याच्या उद्देशाने कामाची सुरुवात करण्यात आली आहे.पक्षाचे विभाग अध्यक्ष जीवन रायते यांनी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी सातपूर विभागातील हॉटेल मध्ये जेष्ठ नेते मधुकर मौले यांच्या अध्यक्षतेखाली व शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव व बाळासाहेब पाटील,विजय तुपलोंढे,समाधान तिवडे, श्रीकांत कदम, फ्रंटल अध्यक्ष बाळा निगळ, निलेश भंदुरे, धनंजय रहाणे, ऋषीराज खरोटे, सिद्धांत काळे, पूनम शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत इच्छुक उमेदवारांना कडून प्रभाग निहाय माहिती घेण्यात आली.

 

प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी शासकीय अधिकारी यांच्या कडे नागरिकांच्या प्रश्न मांडून किती सोडवले जातात.या बाबत चर्चा झाली. तसेच यावेळी सातपूर विभागातून इच्छुक म्हणून ३५ उमेदवारांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.

 

यामध्ये प्रभाग क्र. ८ मध्ये डॉ अमोल वाजे, अमित कोथमिरे,मुन्ना कडलग, प्रवीण पाटील,प्रवीण अहिरे, रुपाली अहिरे,

 प्रभाग ९ मधून कल्पेश कांडेकर, सचिन उशीर, महेश आहेर, श्रीराम मंडळ

प्रभाग १० मधून, बाळासाहेब जाधव, विजय तुपलोंढे, प्रवीण नागरे, दत्ताजी वामन, विश्वनाथ निकम, कपिल भावले, क्रांती पालवे, पूनम शहा, संदीप पवार, सचिन गांगुर्डे

प्रभाग ११ मधून जीवन रायते, बाळा निगळ, डॉ सुनील आंधळे, प्रशांत गांगुर्डे, निलेश भंदुरे, ऋषीराज खरोटे, सिद्धांत काळे, व प्रभाग २६ मधून पंकज भामरे, रामदास मेदगे आदीनी इच्छा व्यक्त केली आहे.

बातम्या

Don`t copy text!