स्थानिक नगरसेवकाचा वैयक्तीक स्वार्था साठी मनपाची तिजोरी रिकामी करण्याचा घाट

नाशिक मिरर : 

प्रभाग क्र. ९ मध्ये पावसाळ्यापूर्वी डांबरी रस्ते कामे करण्यात आले होते. सदर कामाचा दर्जा चांगला नसल्यामुळे पावसाळ्यात सदर रस्त्यावर खड्डे पडले असून आता पुन्हा नव्याने रस्ते करण्याचा घाट घातला जात आहे.त्यामुळे जनतेच्या कर रुपी पैशाचा मनपाच्या पैशाचे आर्थिक नुकसान झाले असून सदर निकृष्ट दर्जा च्या रस्ते कामाचे तपासणी व चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रेम दशरथ पाटील यांनी केली आहे. याबाबत प्रेम पाटील यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन दिले आहे. प्रेम हे माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव आहेत.

 

सर्व रस्त्यांची चौकशी करून त्या रस्त्यांची कामे पुन्हा संबंधित ठेकेदार यांच्या कडूनच करून घ्यावी, त्यामुळे पुन्हा महापालिकेला आर्थिक भुर्दंड बसणार नाही. आणि वाढीव खर्च होणार नाही. नागरिकांना चालता येईल अशी दर्जेदार रस्ते बनवावीत त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. असे निवेदनात दिले आहे.

तसेच महापालिकेच्या अथवा सरकारी जागेत लोकांची श्रद्धा असलेली मंदिर ही महापालिकेने बांधकाम परवानगी दिलेली आहे किंवा काय? दिली असेल तर मंदिरांना आणि महापालिका अथवा सरकारी जागेत सार्वजनिक लोकांसाठी खुल्या असलेल्या ओपन स्पेसला राजकीय किंवा स्थानिक नगरसेवक यांना कुलूप लावण्याची परवानगी कोणत्या नियमांत बसते.सार्वजनिक लोकहितासाठी वापरत असेलेल्या जागा नगरसेवकाना खाजगी वापर करता येत नाही , असा कायदा असतांना देखील तरी आशा ठिकाणी सर्व जागा खुल्या करून लोकांचा हक्क सार्वजनिक आबाधित राहील याकडे लक्ष द्यावे, तसेचज्यांनी ज्यांनी या जागेवर खाजगी मालकी समजून कब्जा केलेला आहे. किंवा दुसऱ्याला करायला लावलेला आहे. त्या लोकहिताच्या सार्वजनिक जागा लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी खुल्या कराव्या.

प्रभाग क्र. ९ मधील लोक राहत नसलेल्या अथवा उभ्या केल्या जात असलेल्या गार्डनला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून करोडो रुपये खर्च करून नुतनीकरणाच्या किंवा शुशोभिकरणाच्या नावाखाली बिल्डरने नवीन लेआउट पाडलेल्या आणि लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी व्यर्थ महापालिकेचा पैसा खर्च करायचा आणि पैशाची उधळपट्टी करायची आणि ज्या ठिकाणी नागरी वस्ती आहे. आशा ठिकाणी पैसे नसल्याचे दर्शवण्यात येत आहे. संबंधित बिल्डरच्या जागेला भाव आणि किंमत कशी वाढेल यासाठी हेतुपुरस्सर ड्रेनेज, रस्ते नेऊन सोडायचे आणि महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी करायची असे अनेज प्रकार प्रभाग क्रमांक ९ मध्ये होत आहेत. गंगापूर शिवारातील शिन्दोरी रस्त्याचे पूर्व बाजूस गाडगी असे या भागाला संबोधले जाते. ही जागा एका नामांकित बिल्डरची होती. संत तुकाराम महाराज यांच्या नावाने गार्डन उभारून सहानुभूती मिळवायची आणि दुसऱ्या बाजूला बिल्डरच्या लेआउटला किंमत मिळवून दयायची. गंगापूर गाव ते गंगापूर गोवर्धन शिव रस्ता सुला वाईन्सकडे जातांना या रस्त्याला बिल्डरने पडलेल्या लेआउट पर्यंत २ कि. मी. रस्ता ड्रेनेज लाईन टाकून लेआऊट करण्यात आला.

असे अनेक कामे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी प्रभाग क्रमांक ९ मध्ये झाले आहेत. वैयक्तीक स्वार्था साठी मनपाची तिजोरी रिकामी केली जात असून, सदर कामामुळे मनपाचे आर्थिक नुकसान झाले आहे.सदर कामाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी प्रेम पाटील यांनी निवेदना द्वारे केली आहे.

बातम्या

Don`t copy text!