नाशिक मिरर :  म्हसरूळ प्रतिनिधी

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ संचालित म्हसरूळ येथील पोकार काॅलनी परिसरातील आठवले-जोशी बालविकास मंदिर या शाळेत दीड दिवसाच्या गणेशोत्सवाची सांगता शनिवारी (दि.11) श्रींच्या विसर्जनाने करण्यात आली.
मुख्याध्यापिका दर्शना मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नंतर गणपती अथर्वशीर्षाचे एक आवर्तन सगळ्यांनी म्हटले. त्यानंतर श्रींची आरती करून पर्यावरणपूरक पद्धतीने बादलीत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले.

याप्रसंगी शिक्षणाने कामाची गुणवत्ता कशी वाढते, हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यात आले. तसेच शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करून विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्ये रुजवली पाहिजे, असेही सांगण्यात आले.
दर्शना मोरे यांनी परिचय करून दिला. सीमा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षिका अहिरे यांनी आभार मानले.

बातम्या

Don`t copy text!