नाशिक मिरर वेबटीम :  नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुक  वर्षभरावर आली आहे. त्यामुळे नगरसेवक होण्यासाठी नगरातील भाऊ, दादा, आण्णा, आप्पा यांनी विविध राजकीय पक्षा मध्ये आपले स्थान निश्चित करून उमेदवारी साठी प्रयत्न सुरू केले आहे.त्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात तर नव्याने पक्ष प्रवेश करून राजकारण प्रवेश करीत आहेत. यावरून सातपूर विभागात शिवसेना व भाजप सोशल माध्यमामध्ये सोशल वाँर सुरू झाले असून, एकमेकावर आरोप प्रत्यारोपण व मी किती जेष्ठ व श्रेष्ठ , पक्षनिष्ठ आहे यावर चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना मधून  भाजपा मध्ये पुन्हा स्वगृही परतलेले बाळासाहेब सानप आणि त्यांनी शिवसेनेत असताना कशी वागणूक मिळत होती हे जाहीरपणे सांगितले. यामुळे शिवसेनाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सातपूर मधील काही कार्यकर्ते यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश मुंबई येथे करवून घेतला व शिवसेना मधून बाहेर पडत आहेत त्यापेक्षा ही जास्त शिवसेना मध्ये नव्याने शिवसैनिक येत आहे हे दाखवून दिले.परंतु यामुळे सातपूर मध्ये चांगली राजकीय चर्चा रंगली असून सातपूर मधील एका राजकीय पुढारी यांनी स्वतःला भाजपा उद्योग आघाडी चा प्रमुख म्हणून शिवसेना मध्ये किती महत्त्वच्या व्यक्ती प्रवेश झाला आहे.असे महानगरप्रमुख बडगुजर यांनी जाहीरपणे सांगितले. परंतु सदर व्यक्ती चा भाजपा सोबत काही एक संबध नाही.त्यांना तीन वर्षापूर्वी बंडखोरी केली म्हणून बाजूला केले होते, असे सातपूर विभागाचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इंघे व इतर पदाधिकारी यांनी प्रतिक्रिया देत. राजकिय चर्चा पे चर्चा (सोशल वाँर ) होत आहे.तर दुसरीकडे शिवसेना मध्ये प्रवेश केलेले समाधान देवरे यांनी देखील मी शिवसेना मध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजप सोबत एकनिष्ठ राहून सर्व जबाबदारी पार पाडली असल्याचे मत व्यक्त केले आहे.

बातम्या

Don`t copy text!