नाशिक मिरर वेबटीम : सातपूर परिसरातील  धृवनगर ,शिवाजीनगर,श्रमिक नगर मध्ये अनेक वर्दळी च्या ठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या डीपी उघड्या आहेत.याबाबत भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी यासंबंधीतील एमएसईबी च्या अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन समस्या सोडवावी अशी विनंती करून देखील सदर धोकादायक डीपी ची अवस्था जैसे थे च आहे. २० डिसेंबर २०१८ रोजी नाशिक शहराचे शहर अभियंता पीएम दरोली यांनी आपल्या संपूर्ण टीमसोबत दौरा केला होता तरीही तेव्हापासून अनेक समस्यांचे निवारण झालेले नाही. अनेक मिनी पिलर हे उघडे आहे.याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु काम मार्गी लागत नाही.सातपूर -गंगापूर विभागातील एमएसईबी  अधिकारीयांच्या हलगर्जीपणामुळे अनेक सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे.असेच २०१८ मध्ये योगेश अमृत पाटील याला वयाच्या ८ वर्षी जीव गमवावा लागला होतो. नगरसेवक दिनकर पाटील व अमोल पाटील यांच्या यांनी एमएसईबी हेड ऑफिस येथे उपोषण केले होते. आज दि.२४ डिसेंबर रोजी  नाशिक शहर भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वत्तमवार,सहाय्यक अभियंता पवार, व प्रदीप गवई यांना सदर बाब निर्देशनास आणून दिले.  तसेच ३ ते ४ दिवसात मिनी पिलर बसवून देऊ असे आश्वासन दिले आहे.सदर समस्या न सोडवल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अमोल पाटील यांनी दिला आहे.
सातपूर :शिवाजीनगर मधील धोकादायक वीज डीपी अवस्था निर्देशनास आणून देते वेळी अमोल पाटील व सोबत एमएसईबी चे अधिकारी 

बातम्या

Don`t copy text!