बातमी मुंबईची… बातमी मागची सत्यता

नाशिक मिरर वेबटीम : शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा लवा जमा सोबत घेत सातपूरच्या भाजपा उद्योग आघाडीचे समाधान देवरे यांनी थेट मुंबईत वरिष्टांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला खरा, मात्र सेनेत गेलेले देवरे यांचा भाजपा उद्योग आघाडीशी कवडी मात्र संबंध नसल्याचा खुलासा भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिवसेनेच्याही स्थानिक नेत्यांनी सदर व्यक्तीच्या पदांबाबत शहानिशा करणे अपेक्षित होते,शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी देखील शिवसेना मध्ये प्रवेश केलेल्या देवरे यांची कोणतीही माहिती न घेता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मध्ये देवरे याना भाजपा उद्योग आघाडी चे प्रमुख म्हणून संबोधले. यावरून नाशिक शहरावर बडगुजर यांची किती मजबूत पकड आहे हे दिसून आले आहे. पण तशी कुठलीही माहिती न घेता केवळ वरिष्ठांना खुश करण्यासाठी नाशिक मधील स्थानिक नेत्यांनी अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन हा केलेला खटाटोप केला असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपाच्या या वक्तव्यामुळे देवरे यांच्यासह सेनेचे स्थानिक पदाधिकारी मात्र तोंडघाशी पडले असून सातपूर सह नाशिक शहरात यावर मोठी चर्चा रंगली आहे.
भाजपातून सेनेत गेलेले आणि नुकतेच सत्ता असतानाही सेनेतून भाजपात परतलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा प्रवेश सोहळा सेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. यावर कुरघोडी करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचेही सेनेत इन कमिंग सुरु असल्याचे चित्र उभे करत सेनेच्या वरिष्ठाना खुष करण्याचा आटापिटा स्थानिक पदाधिकाऱ्याकडून होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा प्रत्यय नुकताच भजपाशी संबंध नसलेल्या एका पदाधिकाऱ्याचा प्रवेश सोहळ्यावरून आला आहे.भाजपा उद्योग आघाडीशी संबंध नसतानाही तसे भासऊन त्या तथाकथित पदाधिकाऱ्याचा प्रवेश सोहळा घेण्यात आला. २०१७ मनपा निवडणुकीच्या काळात उमेदवारीच्या अपेक्षेने देवरे भाजपात आले होते. त्यावेळी रिक्त असलेल्या भाजपा उद्योग आघाडीचे सातपूर संयोजक ही जबाबदारी त्यांना सातपूर पदाधिकाऱ्यांनी दिली होती. पण फक्त उमेदवारीच्या लालसेने पक्षात आले असल्यामुळे पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी ती निवडणूक बंडखोरी करून अपक्ष लढवली व चारशे साडेचारशे इतक्या अतिशय तुटपुंज्या मतांत त्यांना समाधान मानावे लागले होते. तद्नंतर त्यांचा भाजपाशी कुठलाही संबंध नव्हता. त्या मनपा निवडणुकीनंतर ते भाजपा मध्ये कधीही सक्रिय नव्हते भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यांचा समावेश नव्हता. त्यांनी जनतेची फसवणूक करून शिवसेनेत प्रवेश घेताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्याचे भासवून त्यांना महत्त्व प्राप्त करून घ्यायचे होते, परंतु भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहे म्हणूनच शिवसेनेने फेरलेल्या खोट्या बातमीचा जाहीर निषेध करत असल्याचे मंडल अध्यक्ष अमोल इघे यांनी सांगितलं.शिवसेने मध्ये कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला नाही हे पक्ष प्रमुख व पक्ष जेष्ठचा अधिकार आहे.परंतु स्थानिक ठिकाणावरून प्रवेश सोहळे घडवून आणताना तिकीट वाटप करतेवेळी बंडखोरी होऊन सदर पक्षातील एकनिष्ठ शिवसैनिक यांनाच डोकेदुखी ठरू शकते.

शिवसेना चे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा हाच तो व्हिडीओ मध्ये भाजपा चे उद्योग आघाडी चे प्रमुख शिवसेनेत आले असा उल्लेख केला.यावर सातपूर व नाशिक शहरात चर्चा रंगली असून भाजपा शी सदर व्यक्ती संबध नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.

 

बातम्या

Don`t copy text!