भाजीपाला विक्रेत्यांना सावधान तुमचा भाजीपाला जाऊ शकतो चोरीला
अशोकनगर भाजी मार्केटमधून ३० हजार रुपयांचा भाजी पाला लंपास

सातपूर : नाशिक मिरर वेबटीम नाशिक शहरात प्रत्येक विभागात ३ ते ४ नाशिक मनपाचे भाजीमंडई आहेत. सदर ठिकाणी ठरवून दिलेले भाजीविक्रेते मुख्य भाजीमंडई मधून भाजीपाला भरून विकतात व उरलेले भाजीपाला तसाच जागेवर आवरून ठेवतात. परंतु आता भाजीपाला विक्री करणाऱ्या भाजी विक्रेते यांना सावध होण्याची वेळ आली आहे. अशोकनगर मधील भाजीमंडई मधून तब्बल ३० हजार रुपयांचा भाजीपाल्यावर च चोरट्यानी डल्ला मारला आहे. कारण रोजच्या आहारातील भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. रविवारी रात्री काही अज्ञात भुरट्या चोरट्यांनी चक्क बटाटा, लसुन, मिर्ची ,कांदा या भाजी पाल्यावर डल्ला मारून एकूण ३० हजार रुपये किंमतीचा भाजीपाला चोरून नेला आहे.सदर बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सातपूर पोलीस तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ,रविवारी रात्री मार्केटमधील भाजी विक्रेते मनोज सांगळे यांनी रविवारी रात्री ९ वाजता दुकान बंद करून भाजी साहित्य नेहमी प्रमाणे ओट्यावर ठेवून घरी गेले होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात आले असता हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी ५५ किलो लसूण, बटाटे ५५ किलो, मिर्ची 6 पॅकेट असा अंदाजे ३० हजार रुपयांचा भाजी पाला रात्री लंपास केला आहे. तर बेबीबाई शिंदे यांच्या दुकानातुन ५५किलो बटाटे ,लसूण ३०किलो असा अंदाजे १० हजार रूपये भाजीपाला चोरून नेला आहे. लॉक डाऊन नंतर बेरोजगारी वाढली असल्याने व बटाटा लसुन व इतर भाजी किमती वाढल्या असल्याने चोरांनी आपला मोर्चा महागड्या भाजी बाजारावर वळवला असल्याचे दिसुन येत आहे. दोन महिन्यांपूर्वी भुरट्या चोरांनी जाधव संकुल येथील एका किराणा दुकानातुन मिठाच्या ५ गोण्याची चोरी केली होती.अशोकनगर भाजी मंडईची संरक्षण भिंत तीन ठिकाणी तुटलेली आहे.तर गेट देखील तुटलेला आहे.सदर मंडई मध्ये १०० पेक्षा जास्त भाजीविक्रते आहेत.

बातम्या

Don`t copy text!