जलकुंभावर चढुन केली पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

नाशिक मिरर वेबटीम :
सिडको विभागा मधील प्रभाग  क्रमांक २७, २८ व २९  मध्ये गेल्या आठ ते १० दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत सुरू आहे.प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात तक्रारी करत आहेत.पाणी मिळत नसल्याने सिडको मधील कामगार वसाहती मधील कामगार महिलांचे पाणी मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.पाणीपुरवठा अधिकाऱ्या ना अनेकदा तक्रारी करून देखील जाणूनभुजून दुर्लक्ष करत आहेत.त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणी साठी शिवसेनेच्या नगरसेविका किरण दराडे  व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढुन शोले स्टाइल आंदोलन केले.या भागात वेळेवर पाणी येत नाही तसेच कमी येते. पाणी प्रश्नावर आक्रमक असणारे नगरसेविका किरण दराडे सर्व कार्यकर्त्यांसोबत पाथर्डी येथील जलकुंभावर बसून ऑनलाइन महासभेत सहभागी झाले होते. पाणी पुरवठा अधिकारी धारणकर यांच्या निलंबन च्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.व सत्ताधारी बी जे पी च्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या .सदर आंदोलनाची सिडको भागात   दिवसभर चर्चा होती . त्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे, सुनील शेलार, ऋषी ताजने, निखिल शिरोडे, संतोष काकडे, विकी सांगळे, अभिषेक सिंग आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित  होते.

बातम्या

Don`t copy text!