शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख कल्पेश कांडेकर यांचा उपक्रम

नाशिक मिरर वृत्तसेवा :  शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत देवगिरी डोंगर परिसरात ५९ वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वृक्षारोपण कार्यक्रमात पिपंळ, वड, कडुनिंब यांच्या सह विविध प्रकारच्या ५९ देशी व औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे खूप गरजेचे असल्याचे कल्पेश कांडेकर यांनी सांगितले.

 

यावेळी शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख ( शिंदे गट )कल्पेश कांडेकर, शिवसेना विभागप्रमुख दिपक नागरे,सागर बोरसे, दामोदर उगले, निलेश सोनवणे, संदिप भागवत, प्रफुल्ल चव्हाण,पिंटु रकिबे,अभि सावळे,धिरज गवई , आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!