दोन दिवसांत ४ निष्पाप जीव गेले – यांस जबाबदार कोण?
नाशिक मिरर वृत्तसेवा : सागर आनप
शहरात पुन्हा एकदा निष्पाप बालकाचा बळी बांधकाम साईटवरील बेफिकीरपणामुळे गेला आहे. सातपूरमधील भोर टाऊनशिपजवळ खेळत असलेल्या नऊ वर्षीय मयूर संजय भोंडवे या चिमुकल्याचा पाय घसरून खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली.
सदर खड्डा एका चालू गृहप्रकल्पासाठी खोदण्यात आलेला होता. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते, पण कोणतीही सुरक्षा भिंत, फित, सूचना फलक नव्हता!
मयूर आणि त्याचे मित्र खेळत असताना हा अपघात घडला.
प्रसंगावधान राखत आझाद शेख या युवकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि शासकीय रुग्णालयात दाखलही केले, परंतु उपचारादरम्यान रात्री 11 वाजता त्याचा मृत्यू झाला.
सोमवारीही अशीच घटना – 3 बालकांचा मृत्यू
केवळ दोन दिवसांपूर्वी, अमृतधाम विडी कामगार नगर परिसरात, गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहताना तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला होता.
बिल्डर आणि प्रशासनाची बेपर्वाई ठार करतेय!
दोन दिवसांत 4 निष्पाप जीव गेले
कोणतीही सुरक्षितता नाही
कोणावरही गुन्हा दाखल नाही
प्रश्न निर्माण होतोय –
👉 बांधकाम व्यावसायिकांना इतकी मोकळीक का?
👉 प्रशासन झोपेत का?
👉 पालकांच्या वेदनांना न्याय कोण देणार?
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे, मात्र अधिक कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
—
#NashikNews #ChildDeath #ConstructionNegligence #BhorTownship #AmrutdhamTragedy #BuilderResponsibility #NashikAdministration #बालकांचा_मृत्यू #बांधकाम_खड्डा #न्याय_मिळावा

