लूटमारीचे प्रकार वाढले 

नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर एमआयडीसीमधील महिंद्रा सर्कल ते इंडियन टूल्स कंपनीपर्यंतचा प्रमुख रस्ता गेल्या ५ ते ७ दिवसांपासून पूर्ण अंधारात आहे. या मार्गावरील स्ट्रीट लाइट्स बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अत्यंत गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

 

जय इलेक्ट्रॉनिक्स, बॉश, व इंडियन टूल्ससारख्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरात हा रस्ता असून कामगारांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, दिवे बंद असल्याने संपूर्ण मार्ग काळोखात झाकोळला जातो, आणि यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.तसेच चोरी व लूटमारी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिक आणि कामगारांनी याबाबत नाशिक महानगरपालिककडे तक्रार करून देखील अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दररोज शिफ्टनुसार कामावर येणाऱ्या कामगारांना व महिला कामगारांना सायंकाळी ७ ते ८ वाजे दरम्यान अंधारात प्रवास करावा लागत असल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

 

प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन स्ट्रीट लाइट्स कार्यान्वित करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज आहिरे यांसह नागरिकांनी केली आहे.

बातम्या

Don`t copy text!