नाशिक मिरर वृत्तसेवा :

छत्रपती विद्यालय, सातपूर येथे ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना’ विषयी माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एका दिवसात ५० हून अधिक अशा विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली, ज्यांना आई किंवा वडील नाहीत, किंवा जे अनाथ स्थितीत जीवन जगत आहेत.

 

या वेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपमहानगर संघटक रोहिणी रवींद्र देवरे (नाशिक पश्चिम) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे, मुख्याध्यापक रायते सर, तुषार पगार ,जेष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे, तुषार ढेपले, तसेच छत्रपती विद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

 

कार्यक्रमात मुख्याध्यापक रायते सर आणि गोकुळ सोनवणे यांनी ‘बालसंगोपन योजना’ची सविस्तर माहिती दिली. या योजनेंतर्गत ० ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार व आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या मुलांना दरमहा ठराविक आर्थिक मदत दिली जाते. ही मदत थेट मुलांच्या बँक खात्यात जमा होते.

 

या वेळी रवींद्र देवरे यांनी विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड शिबिर, तसेच इतर सरकारी योजनांची माहिती दिली. रोहिणी देवरे यांनी शिक्षकवर्गाचे आभार मानले व उपस्थित मुलांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

सध्या सातपूर परिसरात २७२ हून अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. यामुळे या शिबिराच्या माध्यमातून आणखी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.गरजू व अनाथ मुलांनी व नातेवाईक यांनी सातपूर कॉलनी मधील जनसंपर्क कार्यलयात येऊन कागदपत्रे जमा करून फार्म भरण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

बातम्या

Don`t copy text!