नाशिक मिरर वृत्तसेवा :

       सातपूर भाजप नाशिक महानगर सातपूर मंडलाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये महिला अध्यक्षपदी जान्हवी तांबे यांची निवड करण्यात आली आहे. तांबे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

        भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, आ. देवायानी फरांदे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, गोविंद बोरसे, बाळासाहेब सानप, विजय साने, सतीश कुलकर्णी, प्रशांत जाधव, गिरीष पालवे, काशीनाथ शिलेदार, अँड .श्याम बडोदे, हिमगौरी आहेर-आडके, रोहिणी नायडू-वानखेडे आदींसह पदाधिकाऱ्यांनी तांबे यांचे अभिनंदन केले. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी नारायण जाधव, उपाध्यक्ष दत्ता पाटील, गुलाब माळी, हेमंत नागरे, कल्पना पाटोळे, संदीप काळे, गणेश मौले तर सरचिटणीसपदी गौरव बोडके, नीलेश जोशी, चिटणीसपदी प्रवीण आहिरे, विलास गायकवाड, रवींद्र भोर, – अंबादास आहिरे, संगीता शेळके, विनोद निकम व कोषाध्यक्षपदी – तुषार पगार यांची नियुक्ती झाली आहे.

बातम्या

Don`t copy text!