मालेगाव येथुन धुळयात गंभीर घातपात घडविण्यासाठी तलवारी पाठवल्याचा संशय

नाशिक मिरर वेबटीम : धुळे येथील आझाद नगर परीसरात लोखंडी तलवारींचा मोठा साठा चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास ठाकरे यांच्या पथकाने जप्त केला असुन दोघा गुंडांना गजाआड केले आहे. हा साठा मालेगाव येथुन धुळयात गंभिर घटना घडवण्याच्या उद्देशाने पाठवण्यात आले असल्याची शक्यता पोलिस प्रशासनाने व्यक्त केली आहे.धुळयाच्या सार्वजानिक रुग्णालयाच्या परीसरात दोन तरुणांकडे धारदार शस्त्राचा साठा असल्याची माहीती सहायक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे यांना मिळाल्याने त्यांनी क्षणाचाही उशीर न करता त्यांनी हालचाल केली. यावेळी दोघा तरुणांकडुन एका कापडी पिशवीत असलेल्या 25 तलवारी व एक चॉपर असा शस्त्रसाठा पोलिस पथकाने ताब्यात घेतला. घटनास्थळावरुन शाकीब हुसेन जाकीर हुसेन अन्सारी व अरबाज शमीम शेख या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनी या ठिकाणावरुन आणखी सहा तलवारी संबंधीतांना विक्री केल्याचे प्राथमिक तपासात लक्षात आल्याने पथकाने दोन तलवारी मोहमद शदाब मुख्तार अहमद , एक तलवार तौसिफ अब्बास पिंजारी , एक तलवार अन्सारी अमीर जलील अहमद,दोन तलवारी जियाउर रहेमान इम्रान अहेमद यांना विक्री केल्याची माहीती पोलिसांना मिळाल्याने या तलवारी देखिल जप्त करण्यात आल्या आहेत. या तलवारींचा साठा मालेगाव येथील मुजाहीद व त्याचा साथिदार यस्सा याच्याकडुन आणल्याची माहीती पुढे आली आहे. या तलवारी धुळयात मोठी घटना घडवण्यासाठी आणली गेल्याची शक्यता लक्षात घेवुन सहायक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे यांनी या भागात तपास मोहीम आणखी तिव्र केली आहे.

बातम्या

Don`t copy text!