नाशिक मिरर वेबटीम : मार्गशीर्ष महिन्यातील(margashirsh month) चार गुरूवारी लक्ष्मी मातेची(laxmi mata) पुजा अर्चा केली जाते. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरूवारी देवीचे उद्यापन केले जाते. इतर महिन्यांमध्ये आपण साधारणपणे शुक्रवारच्या दिवशी पुजा केली जाते. मात्र मार्गशीर्ष महिना हा देवीसाठी समर्पित करण्यात आला आहे. या महिन्यातील दर गुरूवारी देवीची पुजा केल्यास घरात धनधान्य भरलेले राहते तसेच सुखसमृद्धी येते. यासोबतच देवीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठिशी राहतो. मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरूवारचे व्रत केल्याने मनुष्याची सर्व संकटे दूर होतात. यासाठी या महिन्यात खास करून श्रीकृष्ण आणि लक्ष्मी मातेची पुजा जरूर केली पाहिजे.
मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी मातेच्या पुजेचे महत्त्व
मार्गशीर्ष महिन्यात दर गुरूवारी लक्ष्मी मातेची पुजा केल्याने धनाशी संबंधित सर्व त्रास दूर होतात.रोजगार, क्लेश आणि धनाशी संबंधित संकटे या पुजा तसेच व्रताने दूर होतात.
अशी करा लक्ष्मी मातेची पुजा
गुरूवारच्या सकाळी सर्वप्रथम स्नान करून पाटावर तांदूळ अथवा गहू पसरवून त्यावर कलश ठेवा. या कलशामध्ये सुपारी, पैसे, दूर्वा घालाव्यात. या कलशाच्या चारही बाजूला हळद-कुंकूवाची बोटे लावावी. या कलशामध्ये पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या अथवा पाच प्रकारची पाच पाने ठेवावी. त्यानंतर यावर नारळ ठेवावा. या कलशाला टेकून देवीची तसबीर ठेवावी. या तसबिरीला पुजेआधी पाणी शिंपडून आंघोळ घालावी. त्यानंतर हळद कुंकू वाहावे. तसेच धूप-दीप-नैवेद्य दाखवावा.फुले वाहावीत. संध्याकाळीही देवीची पुजा करावी तसेच पुस्तक वाचावे. देवीची आरती करावी. त्यानंतर देवीला गोडाचा नैवेद्य दाखवावा. दर गुरूवारी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरूवारी हे व्रत करावे. चौथ्या आणि शेवटच्या गुरूवारी या व्रताचे उद्यापन करावे. तसेच यावेळी कुमारिका मुलींना अथवा महिलांना घरी बोलवावे.त्यांना देवी समान मानून त्यांची पुजा करावी. त्यांना फूळ आणि फळ द्यावे. नमस्कार करावा. यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात. दरम्यान, दर गुरूवारीही देवीचे पुस्तकही जरूर वाचावे.
देवीच्या या मंत्राचा करा जप
श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा।।
ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्म्यै नमः।।
या मंत्राचा संध्याकाळी देवीची पुजा करताना जरूर जप करावा.
