नाशिक मिरर वृत्तसेवा :

या वर्षीचे चे ३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगांव येथे होत असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून नाशिक येथील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक, संशोधक डॉ. अनिल माळी यांची निवड करण्यात आली आहे.

 

पक्षिमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके कार्यरत असून, पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात. अशा प्रकारचे संघटन आणि पक्षिमित्रांचे संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून संपूर्ण राज्यात आजवर ३६ राज्यस्तरीय संमेलने व विभाग स्तरावरील ३० संमेलनांचे आयोजन आजवर करण्यात आले आहे. या वर्षीचे चे ३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगांव येथील न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेज यांचे यजमानपदाखाली शेवगांव येथे होणार आहे. शेवगांव येथील या महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. ०१ आणि ०२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत आहे. या संमेलनाच्या पूर्वी स्थानीक स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या संमेलनासाठी संपूर्ण राज्यातून व राज्याबाहेरून किमान २५० प्रतिनिधी उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

 

संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल माळी हे पक्षी संवर्धन, जनजागृती यासाठी कार्यरत असुन त्यांनी महाराष्ट्र पक्षिमित्रच्या अनेक संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्र राज्य कार्यकारिणी तर्फे डॉ. अनिल माळी यांची एकमताने निवड करण्यात आल्याची महिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.

 

पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार आहेत. गेली 25 वर्ष वन्यजीव अभ्यास पक्षी निरीक्षण करतांना भारतातील प्रमुख 75 पेक्षा जास्त अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानामध्ये अभ्यास नोंदी व छायाचित्रे काढलेली आहेत. *मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय नाशिक येथे मुख्याध्यापक पदावर* कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, येथून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पक्षी प्रजाती विषयक

उद्बोधना करिता कृती कार्यक्रमाची निर्मिती या विषयांमध्ये अंतरविद्याशाखीय विद्यावाचस्पती पीएचडी ही पदवी संपादन केलेली आहे. पक्षी विषयक उद्बोधन हा विषय घेऊन पीएचडी संपादन करणारे ते पहिलेच संशोधक आहेत. त्यांनी केलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन बाली इंडोनेशिया येथे तसेच जहागीर आर्ट गॅलरी मुंबई, बारामती , संभाजीनगर, संगमनेर , सटाणा , जळगाव, यवतमाळ इत्यादी ठिकाणी वैयक्तिक छायाचित्र प्रदर्शने झालेली आहेत तसेच वीस ठिकाणी सांघिक प्रदर्शने झालेली आहेत पक्षी सर्वेक्षण, पक्षीसूची, वन्यजीव अभ्यास, मानव बिबट्या संघर्ष , पक्षी संरक्षण व संवर्धन या विविध उपक्रमात महाराष्ट्र नाशिक वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण, हरित सेना, येथील अधिकारी, कर्मचारी शिक्षक , विद्यार्थी यांना सातत्याने मार्गदर्शन व प्रशिक्षण देत आहेत गिधाड संवर्धन, गिधाड उपहारगृह यांचा विशेष अभ्यास केलेला आहे. नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजा विरोधी सादरीकरण जनजागृती केलेली आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरता महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेतर्फे पक्षीशासर प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला असून महाराष्ट्रातील सातशे विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत महाराष्ट्र शासन वन विभाग नाशिक यांच्यातर्फे वने व वन्यजीव संवर्धन व जटायू संवर्धनाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वसुंधरा पुरस्कार , पर्यावरण मित्र पुरस्कार, उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय नाशिकचा- शिक्षक पुरस्कार असे 25 पेक्षा जास्त पुरस्कार गौरव बक्षीस हे प्राप्त झालेली आहे. विद्यार्थ्यांकरता चार पुस्तिका, पक्षी अभ्यासकांकरता दोन पुस्तके तसेच दोन चित्रफिती प्रकाशित झाले आहेत 900 पेक्षा जास्त स्लाईड शोद्वारे वन्यजीव जैवविविधता, पक्षी निरीक्षण, पर्यावरण इत्यादी विषयांवर विद्यार्थी शिक्षक नागरिक यांच्यामध्ये जागृती केलेली आहे. 2019 मध्ये झालेले तिसरे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. दैनिक वृत्तपत्रे, मासिके दिवाळी अंक , नियतकालिके स्मरणिका व संशोधन निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

 

नांदूर मधमेश्वर अभयारण्यस रामसर दर्जा मिळवून देण्यास सर्वपक्षी मित्रांसह प्रयत्न केले. नाशिक जिल्हा जैवविविधता समिती तसेच नाशिक शहर जैवविविधता समितीवर कार्यकारणी सदस्य म्हणून योगदान दिलेले आहे. नाशिक शहर महानगरपालिका नाशिक क्षेत्रातील पहिली पक्षी सूची तयार करून दिलेली आहे.

बातम्या

Don`t copy text!