नाशिक शहर पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांची संकल्पना

नाशिक मिरर : 

पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित गुन्हेगार सुधार योजनेचे आयोजन शुक्रवारी सातपूर पोलिस ठाण्यात करण्यात आले होते.यावेळी अंबड व इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांना बोलवण्यात आले होते. गुन्हेगारांना सुधारण्याची संधी मिळावी म्हणून पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या संकल्पनेतून गुन्हेगार सुधार योजना राबविण्यात येत आहे . शुक्रवारी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित गुन्हेगार सुधार योजनेत रेकॉर्ड वरील ३२ व अंबड मधील १९ गुन्हेगाराना समुपदेशन करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र लिहून घेतले. सदर गुन्हेगाराच्या वर्तणुकीवर वर्षभर लक्ष ठेवले जाणार आहे.यामुळे गुन्हेगारांना मूळ प्रवाहात येण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे. या मेळाव्यात गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यासोबतच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

स्वयंरोजगारासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे संदीप गायकवाड यांनी योजनेमध्ये गुन्हेगारा सुधारण्याच्या संधी सोबतच त्यांना औद्योगिक वसाहती मध्ये पात्रतेनुसार रोजगार मिळवून देण्यात येणार आहे.तसेच ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना व्यवसाय साठी मार्गदर्शन व कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच यावेळी मानस उपचार तज्ञ डॉ. हेमंत सोनवनिस यांनी गुन्हेगारी मध्ये अडकलेल्या वाट चुकलेल्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी भूतकाळ विसरून योजनेचा फायदा घेऊन वर्तमानाचा विचार करून सुधारणा बाबत महत्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, इंदिरा नगर व अंबड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!