आशादिप महिला वसतिगृहात चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार
जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
आशादीप वसतीगृहाचे प्रकरण विधानसभेत गाजले; दोन दिवसांत चौकशीचे निर्देश
नाशिक मिरर : जळगाव शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार होत असून चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांनी आज २ मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वृत्तामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले आशादिप महिला वसतिगृहात गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरूषांना अनधिकृतपणे प्रवेश दिला जात आहे. पोलीस कर्मचारी हे वसतीगृहातील अधिकारी यांच्या संगनमताने बेकायदेशीर आत प्रवेश करून मनमानी कारभार करून वसतीगृहातील महिला व तरूण मुलींसोबत गैरव्यवहार करत आहे. सोमवारी १ मार्च २०२१ रोजी वस्तीगृहामध्ये काही पोलीस कर्मचारी व अनोळखी पुरूष यांनी प्रवेश करून मुलीसोबत अश्लिल चाळे करून नृत्य करण्यास भाग पाडले. यावर मुलींनी नकार दिल्याने त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात सामाजिक कार्यकत्या मंगला सोनवणे सह इतर कार्यकर्त्या गेल्या असता वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुलींना भेटू दिले नाही. त्यावेळी वसतीगृहात असलेल्या वरच्या मजल्यात राहत असलेल्या मुलींनी खिडकीतून आरडाओरड करून सांगितले की, आम्हाला सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलू द्या. मात्र वसतिगृहातील पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्त्या यांना बोलू दिले नाही आणि मुलीना बोलू न देण्याबाबत दबाव टाकत होते. दरम्यान, आशदिप वस्तीगृहात चाललेल्या या गोरखधंद्याची चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक समिती नेमावी अशी मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे, फिरोज तडवी, फरीद मुशिर खान, प्रतिभा भालेराव, साहिल पठाण, आबिद नाजी शेख, वर्षा लोहार, फारूख कादरी, वासंती दिघे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आशादीप वसतीगृहाचे प्रकरण विधानसभेत गाजले; दोन दिवसांत चौकशीचे निर्देश
जळगाव येथील आशादीप वसतीगृहातील मुलींसोबत घडलेल्या अत्याचाराचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. या प्रकरणी चार सदस्यांची समिती नेमून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसात चौकशीचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणावरून आज विधीमंडळात खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि अन्य अन्य सदस्यांनी या प्रकरणी सरकारचा निषेध करून याची चौकशी करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चार सदस्यीय समिती नेमून दोन दिवसात चौकशी करून अहवाल येईल. यानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
पिढीत महिलांचा आक्रोश व्हिडीओ
