नाशिक मिरर :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभिमान अंतर्गत  दि.२४ जुलै शनिवार रोजी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसंपर्क अभियान बबन लॉन्स,शिवाजीनगर येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितित संपन्न झाले.
          कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्या नंतर शिवसंपर्क अभियानाचा मुख्यउद्देश,शासनाच्या माध्यमातून कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या विविध योजना तळागाळातील जनसामान्य माणसांपर्यंत कशा पोहचवता येतील,आगामी मनपा निवडणुकीसाठी पक्ष बांधणी, कोरोना  काळामध्ये प्रभागांमध्ये कोण कोणती कामे केली, त्या कामांचा आढावा यापुढे आणखी चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत शासकीय योजना राबवण्याचे ध्येयधोरण याबाबत सर्व मान्यवरांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोरोना काळामध्ये नाशिक शहरात मोतीवाला कॉलेज च्या वतीने अर्सनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. त्याबद्दल डॉक्टर फरान मोतीवाला यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख आ. विजय करंजकर ,महानगर प्रमुख  सुधाकर  बडगुजर, मा. मंत्री बबनराव घोलप, मनपा विरोधी पक्षनेते अजय  बोरस्ते, मनपा गटनेते विलास शिंदे, मा.आ वंसत भाऊ गिते ,मा. जिल्हाप्रमुख सुनिल  बागुल, मा.महापौर विनायक पांडे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण  गायकर, महिला आघाडी शोभा  मगर, उप महानगर प्रमुख देवा जाधव, मोतीवाला मेडिकल कॉलेजचे फरान मोतीवाला, सातपुर विभाग प्रमुख युवराज धात्रक, लोकेश गवळी, किरण बडे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख वैभव  ठाकरे आदीं उपस्थित होते.
तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव,सविता गायकर,साहेबराव जाधव,सागर जारे, सम्राट सिंग,नवनाथ शिंदे,सचिन निकम,तुषार पाटील,अविनाश गायकर ,प्रभाग क्रमांक ९ शाखाध्यक्ष संतोष पवार,सोनू काळे,अतुल पवार,प्रवीण इंगोले,विनोद जाधव,प्रितेश पाटील आदींनी प्रयत्न केले.यावेळी शिवसेना पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी,शिवसैनिक,प्रभागातील नागरिक,विविध मंडळांचे प्रतिनिधी, महिला,युवक हे देखील  उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!